अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- वयाच्या १७ व्या वर्षी मी महागड्या काॅलेजमध्ये दाखल झालाे. माझ्या आईवडिलांची कमाई शिक्षणावर खर्च हाेत असे. त्यामुळे ड्राॅपआउट करायचे ठरवले. त्या वेळी भीती वाटली. परंतु आता हाच निर्णय याेग्य हाेता असे वाटते. यादरम्यान रिड काॅलेजमध्ये कॅलिग्राफी शिकली.
तेव्हा ती वापरली जात नसे. परंतु १० वर्षांनंतर मी मॅकिन्ताेश संगणकात ते काैशल्य कामी आले. हा पहिलाच संगणक हाेता, ज्यामध्ये सुंदर टायपाेग्राफी हाेती. जर मी ड्राॅपआउट घेतले नसते तर कॅलिग्राफी शिकली नसती आणि मॅकमध्ये सुंदर टायपाेग्राफी बनवली नसती.
मी भविष्याचा वेध घेत बिंदू जाेडत हाेताे. भविष्यात आयुष्यातील काही असंबद्ध वाटणारे बिंदू परस्परांशी जुळतात. आपणास अंतरात्म्याचा आवाज, जीवन आणि कर्म यावर विश्वास ठेवावा लागताे. या भूमिकेने माझ्या वाट्याला नैराश्य आले नाही. २० वर्षांचा झालाे तेव्हा वडिलांच्या गॅरेजमध्ये ‘अॅपल’ सुरू केले. १० वर्षांत दाेन लाेकांची अॅपल ४ हजार कर्मचाऱ्यांची बनली.
तेव्हा मला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. हे माझ्या पथ्यावर पडले. पुढील पाच वर्षांत मी ‘नेक्स्ट’ आणि पिक्सर कंपनी सुरू केली. अॅपलने ‘नेक्स्ट’ विकत घेतली आणि पुन्हा मी अॅपलमध्ये दाखल झालाे. आमचे तंत्रज्ञान अॅपलसाठी क्रांतिकारक ठरले.
जर अॅपलमधून माझी हकालपट्टी झाली नसती तर हे घडले नसते. केवळ कामावरील प्रेमाने मला पुढे नेले. अद्यापही तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळाले नसेल तर त्याचा शाेध घ्या. १७ व्या वर्षी मी एक प्रेरक वाक्य वाचले हाेते- प्रत्येक दिवस असे जगा, जणू ताेच तुमचा शेवटचा दिवस आहे.
तेव्हापासून मी दरराेज सकाळी स्वत:ला विचारताे, जर आज माझा अखेरचा दिवस असेल तर काय मी तेच केले असते. बरेच दिवस उत्तर नकारार्थी आले तर समजून घेताे की, काहीतरी बदलण्याची गरज आहे. म्हणूनच अन्य कुणाचे जीवन जगण्यात आयुष्य वाया घालवू नका.
अंतर्मनाचा आवाज ऐका. (अॅपल कॉम्प्युटर्सचे सीईओ स्टीव्ह जॉब्ज यांनी हे व्याख्यान २००५ मध्ये स्टॅनफाेर्ड विद्यापीठात दिले हाेते)
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम