अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सोसायटीच्या पार्कींगमध्ये लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना केडगाव उपनगरात घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की, केडगाव येथील अंबिकानगर परिसरातील आदित्य रेसिडेन्सी मध्ये राहणारे प्रसाद दिनकर खेडकर
यांनी त्यांची बजाज कंपनीची दुचाकी (एमएच १६ बीए ६२७७) पार्कींगमध्ये लावली होती. मात्र अज्ञात चोरट्याने ती लंपास केली आहे.
ही घटना दि.१८ ते १९ जून दरम्यान घडली. याप्रकरणी खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोना.जाधव हे करत आहेत.