अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- एकीकडे कोरोना तर दुसरीकडे वाढलेला खर्च आणि मिळणारा अल्प प्रमाणात दर यामुळे आधीच मेटाकुटीला आलेला आहे. त्यात परत चोरांनी कहर केला आहे.
या एका पाठोपाठ येणाऱ्या अडचणीमुळे शेतकरी पुरता खचला आहे. आता तर शेतात उभे असलेले तुरीचे पीक कापून चोरून नेले आहे. ही घटना जामखेड तालुक्यातील मतेवाडी येथे घडली आहे.
याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील मतेवाडी येथील शेतकरी महादेव नामदेव रसाळ यांच्या शेतात तुरीचे पीक होते.
काही एक कारण नसताना धोंडिबा दामू शेळके, भारत देविदास मते, सुग्रीव भारत मते, अतुल भारत मते, बबन बाबा पागिरे,दशरथ गंगाराम डुचे, सोमनाथ देवराम पागिरे,
या ७ जणांनी रसाळ यांची२लाख रुपयांची तूर पिका कापून चोरून नेली आहे. याबाबत महादेव रसाळ यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात वरील सात जनांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.