महाविकास आघाडी सरकारमधील ‘या’ दिग्गज मंत्र्यांच्या घरावर दगडफेक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अनोळखी महिलने ही दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे.

ही प्राथमिक माहिती असून अद्याप या घटनेमागील कारणाचा खुलासा होऊ शकलेला नाही. दरम्यान अशोक चव्हाणांच्या नांदेड येथील घरावर ही दगडफेक झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेने दगडफेक केली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

दगडफेक करणारी महिला कोण होती याची माहिती अजून समोर आली नाही. मात्र ही महिला मनोरुग्ण असल्याचे म्हटले जात आहे. दगडफेकीच्या या घटनेनंतर अशोक चव्हाण यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

या परिसरामध्ये सध्या प्रचंड पोलीस बंदोबस्त असून महिलाचा शोध घेतला जात आहे. ज्यावेळी या महिलेने चव्हाण यांच्या घराच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यावेळी सुरक्षारक्षकांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला.

मात्र, दगडफेक करणाऱ्या या महिलेने फेकलेला एक दगड हा घराच्या दर्शनीभागी असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या केबिनवरील काचेवर लागला आणि काच फुटली.

ही महिला कोण होती तिने का दडगफेड केली या संदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24