रात्रीच्या वेळी नागरिकांच्या घरांवर दगडफेक,ग्रामस्थांकडून निषेध !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील तांदुळवाडी गावातील तुळजा भवानी मंदिरात विशेष ग्रामसभा घेण्यात आली. नागरीकांच्या घरांवर दगड मारून कोणी विनाकारण त्रास दिला, तर कायदेशीर कारवाई करू अशी ग्वाही राहुरी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी दिली.

तर संशयित व्यक्तीला समज देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. तांदुळवाडी गावातील तुळजा भवानी मंदिर परिसरातील पाच ते सहा कुटुंबाच्या घरांवर गेल्या काही दिवसांपासून अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळी दगडफेक होण्याचा विकृत प्रकार सुरू आहे. याबाबत विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी सदर प्रकार अत्यंत चुकीचा असून हा प्रकार थांबला गेला पाहिजे अशी भूमिका घेतली.

तसेच संशयित व्यक्तीचा शोध घेऊन समज देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी याठिकाणी फिरून पाहणी केली व नागरिकांच्या घरांवर विनाकारण दगडफेक केली तर त्या व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भास्करराव पेरणे, बाजार समितीचे संचालक शरदराव पेरणे, माजी उपसरपंच बाळासाहेब पेरणे, पत्रकार विनित धसाळ, माजी चेअरमन गहिनीनाथ पेरणे, शामराव पेरणे, शिवाजी खडके, कानिफनाथ धसाळ, केशव पेरणे, भगवान महाराज मोरे, संजय मोरे, शांताराम पेरणे,

बाळासाहेब पेरणे, भाऊसाहेब गंगाधर पेरणे, मच्छद्रिं चव्हाण, प्रसाद पेरणे, अजिंक्य धसाळ, एकनाथ धसाळ, पांडुरंग पेरणे, साईदास मगर, संजय धसाळ, डॉ. मच्छद्रिं मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24