अज्ञात हल्लेखोरांकडून एसटी बसवर दगडफेक; कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-   एकीकडे एसटी. चा संप मिटविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असताना विध्नसंतोषी लोकांकडून त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच काहीसा प्रकार काल जामखेड आगाराच्या बस बाबत घडला आहे.

जामखेड अगाराची नगर-जामखेड बस (क्रमांक एम एच ४० ए क्यू ६२२४ )नगरहून जामखेडकडे येत असताना आष्टीजवळ गांधनवाडी फटा येथे दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी बसवर दगडफेक केली.

यामध्ये बसच्या काचा फुटल्या. बसवर दगडफेक करून हल्लेखोर पसार झाले. सुदैवाने कोणीही जखमी झाले. या दगडफेकीनंतर बसचालकाने बस आष्टी पोलिस ठाण्यात नेऊन तेथे फिर्याद दिली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सकारात्मक चर्चा होत असल्याने काही कर्मचारी कामावर हजर होत आहे. जामखेड आगारातही अनेक कर्मचारी कामावर हजर झाले.

त्यांच्यामार्फत बससेवा सुरू करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत भीती निर्माण करून संप चिघळविण्याचे प्रकारही सुरू असल्याचे दगडफेकीच्या घटनांवरून दिसून येते.

याचा परिणाम कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांवर होत आहे. जामखेड आगारातून सध्या ८ बस सुरू आहेत. मात्र, दगडफेकीच्या घटनेमुळे दहशत निर्माण होत आहे.

सोमवार रात्रीच्या या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशी देखिल पाहायला मिळाले. सकाळपासून जामखेड आगारातून केवळ १ बस बाहेर पडली आहे.