अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- कोरोनाने मयत झालेल्या ख्रिश्चन समाजातील मृतदेहांच्या दफनविधीसाठी कोणत्याही सुविधा मिळत नाही व दफनविधी झाल्यावर नातेवाइकांकडून पैशाची मागणी
करतात हा दफन विधीचा काळाबाजार थांबवण्याची मागणी विश्व मानवाधिकार परिषदच्या वतीने करण्यात आली आहे.
कोरोना मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी महापालिकेकडून मिळणारा निधी घेऊन देखील सर्वसामान्यांना सेवा न देणार्या संस्थेची निविदा रद्द करुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना देण्यात आले.
यावेळी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उजागरे, आदी उपस्थित होते. महानगरपालिकेकडून कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी करण्याची निविदा अनंत बहुउद्देशीय या संस्थेने घेतली आहे. ख्रिश्चन मयत विधीसाठी आजपर्यंत सुविधा देण्यात आलेली नाही.
जेसीबी, अॅम्बुलन्स व दफन करणारे व्यक्तीसाठी त्यांचे नातेवाईक पैसे मोजत आहे. ख्रिश्चन समाजातील कोरोना मयतांच्या नावाखाली जो शासन पैसे देते त्यांची लूट सुरू आहे. कोरोना मयताच्या नातेवाईकांना या निधीचा लाभ मिळत नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.