मराठा समाजात गैरसमज निर्माण करण्याचे उद्योग बंद करा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- मराठी आरक्षणाच्या प्रश्नावर वस्तुस्थिती लक्षात न घेता भाजप प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील यांना राज्याचे सार्वजनिक बंधकाम मंत्री आणि मराठा आरक्षणउपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यानी आवाहन केले आहे की, कृपया मराठा समाजात गैरसमज निर्माण करण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत.

चव्हाण यांनी ट्विट करत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या समितीचा अहवाल ३१ मे पर्यंत अपेक्षित असून, त्यानंतर राज्य सरकार पुढील निर्णय घेईल, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

चव्हाण यानी ट्विट मध्ये म्हटले आहे की, भाजपने मराठाआरक्षण बाबत समाजाची दिशाभूल करू नये, असे आवाहन आम्ही वारंवार करतोय. पण, दिशाभूल हाच त्यांचा एकमेव अजेंडा दिसतो आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी भाजपवर केली आहे.

आमदार चंद्रकांत पाटील म्हणतात, फेरविचार याचिकेसाठी ४ जून पर्यंतची मुदत आहे. पण ही वस्तुस्थिती नाही. कोरोनामुळे सर्वोच्च न्यायालयाने तसा आदेश दिला नसल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी ट्विट करत भाजपवर हे टीकास्त्र सोडले आहे.

मराठा आरक्षणाबाबत भाजपचा कळवळा केवळ दिखाऊ असल्याची टीकाही चव्हाण यांनी भाजपवर केली आहे. चव्हाण आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत भाजपची दुतोंडी भूमिका पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे.

त्यांनी आज मांडलेले मुद्दे अतिशय गंभीर आहेत. आरक्षणाबाबत भाजपचा कळवळा दिखाऊ असून, या मुद्यावर त्यांना केवळ राजकारणच करायचे आहे, हे स्पष्ट आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24