राज्यातील ‘या’ जिल्ह्यात रेमडेसिविरचा वापर थांबवला; जाणून घ्या कारण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-देशात कोरोनाचा कहर अद्यापही कायम आहे. यातच कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा राज्यात जाणवत आहे.

यामुळे कोरोनाला अटकाव करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहे. यातच कोरोना रुग्नाला उपचारामध्ये वरदान ठरत असलेले रेमडेसिविर इंजेक्शनबाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे.

राज्यातील एका जिल्ह्यामध्ये रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोरोनाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा साईड इफेक्ट झाल्याची माहिती रायगमधून समोर येत आहे.

त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

रायगड जिल्ह्यासाठी हेटेरो हेल्थ केअर कंपनीच्या कोविफोर या इंजेक्‍शनच्या 500 कुप्या पुरवण्यात आल्या होत्या.त्यानंतर साधारण 120 करोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्‍शन वापरण्यात आले होते.

यापैकी 90 रुग्णांना या इंजेक्‍शनमुळे दुष्परिणाम जाणवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सगळ्यांमध्ये इंजेक्‍शन दिल्यानंतर थंडी आणि ताप अशी लक्षणे दिसून आली.

इतक्‍या मोठ्या प्रमाणावर रुग्णांना दुष्परिणाम जाणवल्याने आता अन्न आणि औषध प्रशासनाने संपूर्ण रायगड जिल्ह्यातच रेमडेसिविर इंजेक्‍शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांद्वारे अशी प्राथमिक माहिती समजते आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24