जागेच्या वादातून दोन गटात तूफान हाणामारी; परस्परविरोधी फिर्यादी दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- जागेच्या वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना नगर तालुक्यातील इमामपूर येथे घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

पहिली फिर्याद:-  याबाबत अधिक माहिती अशी कि, भगवान बाेठे यांची आई इमामपूर येथील शेतातील बांधाच्या बाभळी तोडत असताना तुकाराम यशवंत टिमकरे, उदय रामदास टिमकरे, रामदास तुकाराम टिमकरे यांनी शिवीगाळ केली.

तेव्हा बोठे हे हॉटेल हनुमान येथे विचारण्यासाठी गेले असता वरील तिघांनी लोखंडी गज, स्टंप व दांडक्याने उजव्या खांद्यावर पाठीत व हातावर मारहाण करून जखमी केले. याबाबत भगवान बाजीराव बोठे (वय २६, रा. इमामपूर) यांनी फिर्याद दिली आहे.

दुसरी फिर्याद :- रामदास तुकाराम टिमकरे (वय ४२, रा. इमामपूर) यांचे वडील इमामपूर शिवारातील नगर-औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या हॉटेल हनुमान येथे असताना माझ्या वडिलांना तुम्ही हॉटेलची जागा सोडून द्या, ती आमची आहे असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच भगवान बोठे याने कोयत्याने उजव्या कानाच्या खाली खांद्यावर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, रामदास तुकाराम टिमकरे (वय ४२, रा. इमामपूर) यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.

यावरून बाजीराव भानुदास बोठे, बबन बाजीराव बोठे, भगवान बाजीराव बोठे, मिठू बाजीराव बोठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24