अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- राज्य सरकारने जाहीर केलेल्या वीकेंड लॉकडाऊनचा शनिवारी पहिला दिवस असून, त्या पार्श्वभूमीवर काल श्रीगोंदा तालुक्यात कडक लॉकडाऊन पहावयास मिळत आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाने कडक बंदोबस्त केला असल्याने शहरातील सर्व ठिकाणी तसेच
तालुक्यातील प्रमूख गावासह सर्व गावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असल्याने रस्त्यावर दिवसभर शुकशुकाट दिसत होता.
कोरोना पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून. तालुक्यात कोरोनाने थैमान घातलेआहे. सध्या तालुक्यात २४८ कोरोनाचे रूग्ण पॉझिटिव्ह आहे.
राज्य शासनाने शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवस पूर्णपणे लॉकडाऊनची घोषणा केली होती.
त्यानुसार आज शनिवारी पहिल्या दिवशी नागरिकांनी लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद देत निर्बंधांचे पालन केले.
श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार, श्रीगोंदा पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, बेलवंडी पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, अप्पर तहसीलदार चारुशीला पवार,
नायब तहसीलदार डॉ.योगिता ढोले यांच्या सह सर्व प्रशासकीय अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यंसह सकाळपासून रस्त्यावर उतरून बेजबाबदार,विनामास्क विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत होते.
प्रशासनाने कडक बंदोबस्त केला असल्याने शहरातील सर्व ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असल्याने रस्त्यावर दिवसभर शुकशुकाट दिसत होता.