राज्यात कडक लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता पुढील 15 दिवस कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.

याबाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे हा लॉकडाऊनही गेल्या वेळेप्रमाणे लॉकडाऊनसारखाच कडक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ”राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहे. कडक लॉकडाऊन हवा, ही जनतेची भावना आहे.

उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत. ऑक्सिजन प्लाँट उभारून हवेतील ऑक्सिजन कामी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुख्यमंत्री उद्या निर्णय जाहीर करतील”, असे एकनाथ शिंदे काल म्हणाले. राज्यामध्ये कोविडचे आकडे वाढतायत. हे पाहिल्यानंतर राज्यामध्ये फारच भयंकर आणि भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे.

वाढणारे आकडे खाली आणायचे असल्यास कठोर निर्बंध घेण्याची आवश्यकता आहे. अनेक निर्बंध घालूनही माणसं फिरतायत, वाहनं फिरतायत, नंबर खाली येत नाहीयेत. त्यामुळे कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24