राज्यात दोन दिवसांत कडक लॉकडाऊन?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-  संचारबंदीचा फायदा सध्या पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही. आपण लॉकडाऊन केलेला नाही. अनेक व्यापाऱ्यांचा लॉकडाउनला विरोध होता.

पण आज व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची तसंच इतर लहान दुकानं असणारेही लॉकडाऊन १०० टक्के करा, अशी मागणी करत आहेत.

अनेक जिल्ह्यांमध्येही लोक मागणी करत आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. दोन दिवसांत कडक लॉकडाऊनसंबंधी निर्णय अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन तो निर्णय घेतील, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. वडेट्टीवार म्हणाले, राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली दिसत नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अंदाज चुकवला. सगळ्यांना वाटत होतं, लाट सौम्य येईल पण ही लाट तीव्र निघाली. कोणालाच याची कल्पना नव्हती.

दिल्लीने कडक लॉकडाऊन केला असून त्याची माहिती आम्ही घेत आहोत. लॉकडाऊन कसा आहे, त्यांची नियमावली काय आहे यावर चर्चा करण्याचा निर्णय झाला आहे,”

अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. दिल्लीच्या लॉकडाऊनचं काय स्वरुप आहे? लोकलसंबंधी काय निर्णय घेतला आहे? अत्यावश्यक सेवांना काय सूट दिली आहे?

ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर स्वरुप ठरवून नंतर घोषणा करण्याचा आमचा विचार आहे असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारने एसडीआरएफमध्ये कोविडसाठी पैसे दिलेले नाहीत. गेल्यावेळी १२०० कोटी रुपये दिले होते.

मागच्या वेळी ३ एप्रिलला पैसे आले होते, पण आज १९ एप्रिल असून अद्यापही पैसे आलेले नाहीत. हे टीका म्हणून नाही, पण उशीर झाला आहे. यावर्षी त्यांच्याकडून १६०० कोटी अपेक्षित आहे,” असे वडेट्टीवार यांनी सांगितलं.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24