कोरोना रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन करा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असून तो रोखायचा असेल, तर किमान पंधरा दिवस संपूर्ण कडकडीत लॉकडाऊन पाळणे अत्यंत गरजेचे आहे.

किराणा, भाजीपाला बंद झाल्यानंतर जनतेची अडचण होणार आहे, यात शंका नाही. मात्र, आज कोरोना वाढीचा वेग व मृत्युचे प्रमाण बघता आपणच कठोर निर्णय घेऊन प्रत्येकाचा जीव सुरक्षित ठेवला पाहिजे, असे मत शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी व्यक्त केले.

अनेक कारणांमुळे सुरू असलेला लॉकडाऊन प्रभावी दिसत नाही. काही व्यवहार सुरू, तर काही बंद असल्याने लोक घराबाहेर पडणार व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणारच आहे.

नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने घराबाहेर पडून करोना वाढीला हातभार लागत असून लॉकडाऊन पूर्णपणे यशस्वी करायचा असेल, तर शंभार टक्के संचारबंदी-व्यवहार बंदी हाच एकमेव उपाय आहे.

रुग्णालये, औषधे, लॅब, सर्व वैद्यकीय सेवा अती आवश्यक असून हे वगळता सर्व आस्थापने बंद करा, अन्यथा सर्वांना आस्थापने उघडण्याची मुभा द्या. विशेष म्हणजे शासनाने घालून दिलेले कुठलेही निबंध पाळले जात नाहीत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24