अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- कोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेवून कठोर नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे.यासंदर्भात प्रशासनातील अधिकार्याशी आपली चर्चा झाली असून रुग्ण संख्या रोखण्याच्या दृष्टीने सर्वानाच सतर्क राहावे लागणार असल्याचे सुतोवाच भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
बाभळेश्वर येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील प्राथमिक, माध्यमिक,उच्यमाध्यमिक , अंध व मूकबधिर केंद्रात सहकार चळवळीचे जनक पदमश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील व लोकनेते पदमभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांचे तैलचित्रचे अनावरण आ.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कोव्हीडच्या सर्व नियमांचे पालन करून बाळासाहेब घोरपडे यांचा सेवापूर्ती सोहळा व २०० मीटर ट्रॅकचे भूमिपूजन व विद्यालयातील अंध व मूकबधिर मुलांना स्पोर्ट ड्रेसचे वाटप व स्व. मंजुळाबाई घोगरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त अंध व मुकबाधिर केद्रास १० हजार रुपयांच्या मदतीच्या धनादेश आ.विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
माजी सभापती तुकाराम बेंद्रे ,पंचायत समितीचे माजी उपसभापती बबलू म्हस्के,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजुरकर,उपसभापती बाळासाहेब जपे,विखे पाटील कारखान्याचे संचालक साहेबराव म्हस्के, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक ज्ञानदेव म्हस्के,मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक आंबादास ढोकचौळे, ह भ प नवनाथ महाराज म्हस्के,ग्रामपंचायत सदस्य अजित बेंद्रे,
माजी संचालक आणासाहेब बेंद्रे, उपसरपंच अमृत मोकाशी,भारत घोगरे,भाऊसाहेब चेचरे,प्राचार्य दीपक डेंगळे याप्रसंगी उपस्थित होते. आ. विखे पाटील यांनी प्रामुख्याने कोव्हीडच्या वाढत्या रूग्ण संख्येवरून चिंता व्यक्त करतानाच कोरोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही.
मोठ्या संख्येत होत असलेले कार्यक्रम,बाजारात खरेदीच्या निमित्ताने होणारी गर्दी या सर्वच गोष्टीबाबत पुन्हा एकदा कडक नियम पाळण्याची गरज निर्माण झाले असल्याचे स्पष्ट करून आ.विखे पाटील म्हणाले की याबाबत महसूल पोलीस आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी आपली चर्चा झाली असून येत्या एक दोन दिवसातच नियमावलींची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील गावांमध्ये भरणारा आठवडे बाजार बंद करण्याबाबत स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकार्यांशी चर्चा करून परीस्थीतीनुरूप निर्णय करण्याबाबच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे आ.विखे पाटील यांनी स्पष्ट केले. एक वर्षापूर्वी आलेल्या या संकटाचा सामना आपण सर्वानी केला.या काळातील आव्हानात्मक परिस्थितीवर मात करून जनजीवन पुर्ववत सुरू झाले असतानाच पुन्हा या संकटाची भीषणता समोर आली आहे.
त्यामुळे आता प्रत्येकाची जबाबदारी वाढली असल्याची जाणीव करून देत विखे पाटील यांनी सांगितले की गरजेपुरते घराबाहेर पडा,कुटूंबातील समारंभ कमी संख्येत साजरे करून नियम पाळा,सार्वजनिक ठिकाणी गावपातळीवर गर्दी न करता आगामी काळात होळी धुलीवंदन आणि इतर सर्वच सण साध्या पध्दतीने साजरे करण्याचे आवाहनही आ.विखे पाटील यांनी केले.
पहील्या संकटाच्या वेळी दवाखाने बंद होते.उपचारांसाठी कोव्हीड सेंटर शिवाय पर्याय नव्हता.आता दवाखाने सुरू आहेत त्यामुळे छोटासा आजारही अंगावर काढू नका.जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा फॅमिली डॉक्टरकडून उपचार घ्या.याबाबत आरोग्य विभागाला सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कोव्हीड प्रतिबंधात्मक लसही उपलब्ध झाल्याने याबाबतही नागरीकांनी सतर्कता दाखण्याचे आ.विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.