विद्यार्थ्यांनो लक्ष द्या : परीक्षांबाबत पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पदवी आणि पदव्युत्तरच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा पुढच्या महिन्यात होणार आहेत.

दि.15 जूनपासून टप्प्याटप्प्याने याबाबत नियोजन करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दुसऱ्या सत्राची परीक्षा सुद्धा ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून, विद्यापीठाने 15 मे पासूनच या परीक्षांचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत दुसऱ्या सत्रातील परीक्षा घेण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी झाली. त्यात दुसऱ्या सत्रातील परीक्षा घेण्यावर चर्चा झाली. त्यानंतर या परीक्षा 15 जूनपासून टप्प्याटप्प्याने घेण्यावर एकमत झाले.

ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून, त्याची रूपरेषा परीक्षा विभागाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रथमतः कला वाणिज्य आणि विज्ञान या अभ्यासक्रमाच्या परीक्षा जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरु करून अभ्यासक्रमाच्या परीक्षा टप्प्याटप्प्याने घेण्याबाबत परीक्षा मंडळाच्या बैठकीत एकमत झाले.

तसेच प्रात्यक्षिक परीक्षांचे गुणही महाविद्यालयांकडून स्वीकारण्याबाबत कालावधी निश्चित करण्यात आला. प्रथम सत्राची परीक्षा संपत आली असून दुसऱ्या सत्रातील परीक्ष लवकर घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती.

त्यामुळे विद्यापीठाने दुसऱ्या सत्राच्या परीक्षेचे नियोजन करण्याचे काम हाती घेतले. त्यानुसार या परीक्षा येत्या जूनपासून सुरू होणार आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24