अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- श्रीगोंदा नगरपालिकेच्या विषय समितीच्या निवडीत दोन्ही बाजूने बिनविरोधचा प्रस्ताव पार करत दोन समितीचे सभापती भाजपला तर दोन समितीचे सभापती काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडे देण्यात आले.
श्रीगोंदा नगरपालिकेत विषय समिती सभापतीच्या निवडी प्रांताधिकारी स्वाती दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. यावेळी नियोजन व विकास समिती सभापती काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे राजाभाऊ लोखंडे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सिमाताई प्रशांत गोरे,
बांधकाम समिती सभापती पदी भाजपचे संग्राम घोडके, पाणी पुरवठा सभापती पदी भाजपचे शहाजी खेतमाळीस, आरोग्य सभापती उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, महिला व बाल कल्याण समितीच्या उपसभापती भाजपच्या वनिता संतोष क्षिरसागर यांची निवड झाली.
स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिध्द अध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा शुभांगी ताई मनोहर पोटे यांची निवड झाली. या यावेळी मुख्याधिकारी मंगेश देवरे, गटनेते मनोहर पोटे सर्व नगरसेवक उपस्थित होते.