Successful Farmer: राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये मोठा बदल करत आहेत यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा देखील होत आहे. बारामती तालुक्यातील (Baramati) शेतकरी देखील आता काळाच्या ओघात पिक पद्धतीत बदल करताना बघायला मिळत आहेत.
विशेष म्हणजे शेतकरी बांधवांनी केलेला हा बदल त्यांच्यासाठी विशेष फायद्याचा ठरत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातील मौजे कोऱ्हाळे येथील प्रयोगशील शेतकऱ्याने देखील काळाच्या ओघात शेतीमध्ये मोठा बदल केला आणि आज त्याचा हा बदल त्याच्यासाठी मोठा फायद्याचा ठरला आहे.
अजित पोमने या प्रयोगशील शेतकऱ्याने शेतीमध्ये जरा हटके करण्याच्या विचाराने सिद्धिविनायक हायटेक नर्सरी ची स्थापना केली. याच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या क्वालिटीची रोपे परिसरातील शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे याच्या जोडीला त्यांनी कलिंगड हंगामी पिकांची लागवड देखील केली.
अजितराव दरवर्षी उन्हाळ्यात कलिंगड पिकाची शेती (Watermelon Farming) करत असतात. या वर्षी देखील त्यांनी उन्हाळी हंगामात कलिंगड पिकाची (Watermelon Crop) शेती केली आणि अवघ्या अडीच महिन्यात कलिंगडच्या पिकातून साडेतीन लाखांचे उत्पन्न (Farmer Income) कमवून दाखवले. अजित यांनी मिळवलेल्या या यशामुळे पंचक्रोशीत त्याच्याचं नावाची चर्चा बघायला मिळतं आहे.
खरं पाहता अजितराव यांनी 2012 पासून शेतीमध्ये बदल करण्यास सुरुवात केली. सुरवातीला पीक पद्धतीत मोठा बदल करण्याचा ठरवलं त्या अनुषंगाने त्यांनी पारंपरिक पिकांऐवजी बागायती पिकाला प्राधान्य दिले. मग काय शेतात ऊस, कलिंगड, वांगी टोमॅटो अशा पिकांची शेती सुरू केली आणि आज त्यांना या नगदी पिकातून चांगला बक्कळ पैसा मिळत आहे.
शिवाय त्यांनी शेती पूरक व्यवसाय देखील सुरू केला. 2014 मध्ये त्यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आणि 2 पोल्ट्री उभारले. आज कुक्कुटपालन व्यवसायातून देखील त्यांना बक्कळ कमाई होत आहे.
अजित राव भाजीपाला वर्गीय पिकांची शेती करत असतं मात्र त्यांना भाजीपाला रोपांसाठी अधिक पैसा खर्च करावा लागतंअसतं त्यामुळे त्यांनी रोपवाटिका उभारली.
यासाठी शासनाचे अनुदान देखील मिळाले. शासनाच्या अनुदानामुळे त्यांना रोपवाटिकाची उभारणी करता आली. निश्चितचं अजित यांनी शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला आणि आज आज बदल त्यांच्यासाठी शास्वत उत्पन्नाचे साधन बनले आहे. निश्चितच अजित राव यांनी इतर शेतकऱ्यांसाठी एक नवीन मार्ग दाखवून दिला आहे.