विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाच्या मदतीने बाहेर काढण्यात यश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-  विहिरीत पडलेला कोल्हा बाहेर काढण्यात कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील युवकांना यश आले आहे.

यापूर्वीही भक्ष्याच्या शोधात असलेल्या प्राण्यांमध्ये बिबट्या विहरीत पडल्याच्या अनेकदा घटना घडल्या आहेत. भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने प्राणी विहिरीत पडले आहे.

वनविभागाच्या सहकार्याने त्यांना विहिरीबाहेर सुखरूप वाहेर काढून पुन्हा जंगलात सोडून देण्यात आले आहे. असाच काहीसा प्रकार कर्जत तालुक्यात घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बबन भांडवलकर कामानिमित्त शेतात गेल्यानंतर कोल्हा विहिरीत पडलेला असल्याची माहिती भांडवलकर यांना मिळाली होती.

त्यानंतर त्यांनी गावातील गणेश घनवट, राजू शेख, अशोक घनवट आदींना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर युवकांनी एकत्र येऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने शर्थीच्या प्रयत्नानंतर जाळीच्या मदतीने कोल्ह्याला बाहेर काढून जीवदान देण्यात आले. कोल्हा सुखरूप असल्याने त्याला सोडून देण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24