अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ गोळीबार प्रकरणातील गोळी काढण्यात यश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-रविवार दि.2 मे रोजी रात्री 9:20 वाजेच्या सुमारास लांडेवाडीतील एका मौदानावर हॉलीबॉल खेळत असताना सोमनाथ तांबे (वय 21 वर्षे) रा.लांडेवाडी(भेंडा) याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला होता.

गोळी लागून जखमी झालेल्या अवस्थेत त्याला त्याच्या मित्रांनी नेवासा येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर त्याला नगर येथे आणि नंतर पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते.

पुणे येथे त्याच्यावर शस्रक्रिया करून गोळी काढण्यात आल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे. दरम्यान नेवासा पोलिसांनी पुणे येथे जाऊन सदर गोळी पंचनामा करून ताब्यात घेतली आहे.

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे 2 मे रोजी हॉलिबाल खेळतांना झालेल्या गोळीबारातील जखमी सोमनाथ बाळासाहेब तांबे याच्यावर पुणे येथील एका रुग्णालयात शस्रक्रिया करून त्यांचे छातीत रुतून बसलेली गोळी काढण्यात यश आले असून सोमनाथ ची प्रकृती स्थिर असून त्याला लवकरच दवाखान्यातुन घरी सोडण्यात येणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24