Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Success Mantra : तुम्हालाही असेल अशी घाण सवय तर आजच सोडा, नाहीतर तुम्ही आयुष्यात कधीही यशस्वी होणार नाही

अनेकांना आपल्या जीवनात यशस्वी व्हावे असे वाटत असते. परंतु काही जण यश मिळवण्यासाठी काही चुका करत असतात.

Success Mantra : धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच यश हवे आहे. काही जण यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करतात तर काही जण कोणतेही प्रयत्न न करता यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतात. तर काहीजणांना आजचे काम उद्यावर ढकलण्याची सवय असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अनेकांना अशी घाण सवय असते. त्यामुळेच त्यांना त्यांच्या जीवनात कधीही यशस्वी होता येत आहे. त्यामुळे जर तुम्हालाही अशी घाण सवय असेल तर ती आजच सोडा करा, अशी सवय तुमच्या यशस्वी होण्यासाठी अडथळा ठरत आहे. यशस्वी होण्यासाठी 5 मंत्र आहेत जाणून घ्या.

1. ध्येयाप्रती समर्पित

जर तुम्ही ध्येयाप्रती समर्पित राहिला तर काम टाळणे तुम्हाला सोपे जाणार नाही. कारण प्रत्येक कामाला एक विशिष्ट वेळ आणि महत्त्व असून त्यानंतर ते काम केले तर याला काही अर्थ नाही. जरी तुम्ही कितीही हुशार असला तरी वेळ आणि कालमर्यादा जर आपण पाळू शकलो नाही तर आपली सर्व कष्ट व्यर्थ आहे.

2. एका वेळी 2 कामे करणे

बऱ्याच वेळा आपण स्वतःला सर्वोच्च सिद्ध करण्यासाठी एकाच वेळी अनेक गोष्टी करतो. मात्र याचा परिणाम असा होतो की आपल्याला कोणतेही काम नीट करता येत नाही, त्यामुळे एका वेळी एकच काम करा. जर तुमच्याकडे केवळ एकच गोष्ट करायची असल्यास तुम्ही ती पूर्ण एकाग्रतेने करा. जेव्हा तुम्ही एखादे काम काही टक्के पूर्ण करत असता, तेव्हा तुम्हाला पुढे जाण्याचा आत्मविश्वासही मिळत जातो.

3. यशस्वी लोकांकडून प्रेरणा घ्यावी

सर्वांच्या जीवनात प्रगतीसाठी प्रेरणा खूप महत्वाची असून तुमच्या आजूबाजूला असे अनेक यशस्वी लोक असतील, जे तुमच्यासाठी प्रेरणास्त्रोत बनू शकतील. त्या लोकांनी कोणते मार्ग स्वीकारले आहेत? त्यांना त्यांच्या करिअर किंवा नोकरीत मोठ्या उंचीवर नेले आहे हे तुम्ही शोधू शकता. तुम्हीही त्यांची सूत्रे आणि पद्धती अवलंबून नवीन यश मिळवू शकता. जेव्हा तुम्ही त्या लोकांच्या विचारांनी प्रेरित व्हाल, तेव्हा तुमच्या आतून नकारात्मक गोष्टी आपोआप बाहेर पडतील.

4. काम खंडित करणे

जेव्हा अचानक एखादं मोठं काम समोर आलं आणि ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे असल्यास अशा ध्येयाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक राहत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी या मोठ्या कामाची अनेक छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागणी करा. ती कामे एक एक करून पूर्ण करत राहा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये सर्वात महत्त्वाचे काम आधी करण्याचा प्रयत्न करावा.

5. तर उच्च ध्येय गाठता येते

हे नेहमी लक्षात ठेवा की कोणतेही काम तेव्हाच ध्येयापर्यंत जाते जेव्हा तुमची त्याबद्दलची तळमळ आणि समर्पण खरे असते. अर्ध्या मनाने केलेले कोणतेही काम त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे जर कोणत्याही कामाकडे तुमचा हेतू जास्त नसल्यास तुम्ही त्याकडे टाळाटाळ करणारी वृत्ती ठेवाल हे उघड आहे.