Success Story : जर तुमच्याकडे शेती असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण देशातील शेतकरी शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत, यासाठी काय उपाययोजना करतात ते जाणून घ्या.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेतकऱ्यांबद्दल सांगणार आहे. या शेतकऱ्याचे नाव ज्योतिराम गुर्जर आहे. या शेतकऱ्याने 4 एकर शेतीमध्ये अश्वगंधा या पिकाची लागवड करून एका वर्षात सुमारे 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
राजस्थानमधील भरतपूर या ठिकाणी राहत असणारा एक शेतकरी अश्वगंधाची लागवड करून प्रत्येक वर्षी लाखो रुपये कमवत आहे. अश्वगंधा ही वनस्पती आयुर्वेदातील एक प्रमुख औषधी वनस्पती आहे आणि ते प्रामुख्याने वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरलं जातं.
भरतपूर मधील शेतकरी ज्योतिराम गुर्जर यांनी सांगितले की, गेल्या बरेच वर्षांपासून त्यांच्या मित्राच्या दोन एकर जमिनीमधील अश्वगंधा चा चांगला नफा मिळत होता. त्या मित्राच्या सांगण्यावरून दोन वर्षांपूर्वी सुमारे चार एकर जमिनीमध्ये अश्वगंधा लागवड सुरू केली.
अश्वगंधा हे पीक साधारणतः 5-6 महिन्यांत पिकल्यानंतर तयार होते त्याचबरोबर या पिकाला मार्केटमध्ये चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्याला लाखो रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
शेतकरी ज्योतिराम गुर्जर त्यापुढे म्हणाले की, त्यांच्या गावामध्ये पारंपरिक शेतकरी हे शेतीऐवजी नगदी पिकांकडे विशेष लक्ष देत आहेत. त्यामुळे त्याच्या गावात असणारे 90 टक्के शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे.
अश्वगंधा आणि तुळशीची लागवड त्याचा मित्र मानसिंग हा गेल्या 5 वर्षांपासून करत आहे असे या शेतकऱ्याने सांगितले. मानसिंग हा अतिशय कमी खर्चात जास्त नफा घेत होता. त्यांच्या सांगण्यावरून मी 2 वर्षांपूर्वी सुमारे 4 एकर शेतात अश्वगंधा या पिकाची लागवड सुरू केली. हे पीक 5 ते 6 महिन्यांत पिकते तसेच एक एकर क्षेत्रावर 5 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
चार एकर शेतात एका वर्षात सुमारे 10 लाख रुपयांचे उत्पन्न हमखास मिळते. आयुर्वेदिक औषधे तयार करत असणाऱ्या कंपन्या हे पीक थेट खरेदी करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना त्या पिकासाठी चांगला भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.
युनानी या औषध मध्ये अश्वगंधाचे विशेष महत्त्व आहे. यामुळेच अनेक आजारांवर हे औषध फायदेशीर ठरते. अश्वगंधा वापरल्यामुळे पांढरे केस आणि लठ्ठपणा यापासून आपला बचाव होतो. त्याचबरोबर डोळ्यांचे आजार,टीव्हीचे आजार, छातीत दुखणे, पोटाचा त्रास घशाचे आजार, आणि अशक्तपणाही बरा होतो, असे डॉक्टरांचं मत आहे.