ताज्या बातम्या

Success Story: खरंच की काय..! हा उच्चशिक्षित आंबा बागायतदार कमवतोय लाखों; जगातील सर्वात महागड्या आंब्याचे देखील घेतो उत्पादन

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Success Story: देशातील शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात शेतीत बदल करीत आहेत. पीकपद्धतीत बदल करून शेतकरी बांधव आता चांगले उत्पन्न कमवीत आहेत.

मध्यप्रदेशच्या जबलपूर (Jabalpur) येथील एका शेतकऱ्याने (Farmer) देखील पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत फळबागेची लागवड करून चांगला नफा कमावला आहे.

जबलपूरच्या संकल्प परिहार या शेतकऱ्याने बारा एकर क्षेत्रात आंब्याची बाग लागवड (Mango orchard cultivation) करून लाखोंचा नफा कमविला आहे.

संकल्प यांच्या आंबा बागेत 24 प्रकारचे आंबे आहेत. यात अनेक अत्यंत दुर्मिळ जातीच्या आंब्याचा देखील समावेश आहे. बागायतदार संकल्प परिहार

यांच्या बागेमध्‍ये जगातील सर्वात महागडा आंबा अर्थात जपानी प्रजातीचा ‘तायो नो तामागो’ (Tayo no Tamago) ह्या आंब्याची जात देखील आहे. जपानमध्ये त्याची किंमत 2.50 लाख रुपये प्रति किलो असल्याचा दावा केला जातो.

जबलपूर-चारगव्हाण रस्त्यावर तिलवाडा येथून 6 किमी अंतरावर संकल्प सिंह यांची साडेचार एकर आंब्याची बाग आहे. तर दुसरी 8 एकराची बाग नर्मदेच्या काठावर घुगराजवळ आहे.

चार एकर बागेत 1100 आणि 8 एकर बागेत सुमारे 2500 आंबे व इतर फळझाडे आहेत. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले संकल्प हे महादेवाचे अनन्य भक्त आहेत. हेच कारण आहे की हा महादेव भक्त आंबा बागायतदार आपल्या बागेचे पहिले फळ उज्जैन येथे भगवान महाकालास अर्पण करतो.

संकल्प यांच्या आंब्याच्या बागेत सुमारे चोवीस प्रकारच्या प्रजाती आहेत. यामध्ये आम्रपाली, मल्लिका, हापूस, केसर, बदाम, दसरी, लंगडा, चौसा, सफेदा, बांबूग्रीन, ‘तैयो नो तमगो’ मियाझाकी, ब्लॅक मँगो,

जंबो ग्रीन, जपानी, ड्रॅगन, यूएसए सक्सेशन, गुलाब केशर, हुस्नारा, हल्दीघाटी, गुलाब खास, गौरजीत, नाइटिंगेल, अर्का, अनमोल, पुनीत इत्यादी आंब्याच्या जाती आहेत.

याशिवाय संकल्प यांच्या फळबागेत सीडलेस जामुन, बालाजी लिंबू, गुलाब सफरचंद, इटालियन सीडलेस लिंबू, चिकू, अंजीर, मोसंबी, तुतीसह इतर अनेक झाडे आहेत.

संकल्पने 2013 पासून फलोत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. 2013 पूर्वी तेही पारंपरिक पद्धतीने गहू आणि धानाची लागवड करत असत. मात्र, एकदा संकल्प त्याच्या वडिलांच्या मित्राच्या नर्सिंग होममध्ये गेला होता. नर्सिंग होमच्या आवारात बागही होती. त्यात आंब्यासह इतर झाडे होती. तिथून त्याला फलोत्पादन घेण्याची प्रेरणा मिळाली आणि या अनुषंगाने त्यांनी पुढील कार्य सुरू केले.

संकल्प यांचा संकल्प असा आहे की ते जे ठरवतात ते करतातच. नर्मदेच्या काठावरील खडकाळ जमिनीवर त्यांची आठ एकरांची जी बाग आहे, तिथली आंब्याची झाडं लावण्याची कहाणीही खूपच रंजक आणि हटके आहे.

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, पावसाळ्यात बागायती रोपे लागवड करावी जेणेकरून झाडांची वाढ चांगली होईल आणि चांगले उत्पादन मिळू शकेल, पण संकल्प यांनी एप्रिलच्या कडक उन्हात खडकाळ जमिनीत आंब्याची रोपे लावली. नर्मदेच्या पाण्याने आंब्याच्या बागेला पाणी दिले.

संकल्प यांनी सांगितले की, एप्रिलच्या कडक उन्हात झाडांना जास्त सूर्यप्रकाश मिळेल, त्यामुळे त्यांचा जगण्याचा रेट जास्त असेल. जी झाडे सूर्यप्रकाशात टिकतील ते पुढील काळात सुकणार नाहीत. यामुळे त्यांनी लोकांचा टोमणा देखील सहन केला आणि नर्मदेच्या पायथ्याशी खडकाळ जमिनीत, प्रचंड उन्हात आंब्याच्या बागा लावता येतात हे त्यांनी दाखवून दिले.

जसं की आपण बघितलं संकल्प यांनी 2013 मध्ये आंब्याच्या बागा लावल्या. म्हणजेच आंब्याच्या बागाना आता सुमारे 9 वर्ष होतं आलीत. या नऊ वर्षात त्यांनी दरवर्षी 8 ते 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

एवढेच नाही आंब्याची दरवर्षी झाडे देखील वाढत आहेत. तसेच आता फळांची उत्पादन क्षमताही वाढत आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एकदा आंब्याची रोपे लावली की त्यांना 35 ते 40 वर्षे फळे येतात.

संकल्प यांच्या बागेतील सर्वोत्तम आणि चांगल्या क्वालिटीचा आंबा मल्लिका जातीचा आहे. संकल्प सांगतात की, हा आंबा एकदा चाखला की दुसरा आंबा आवडतच नाही.

संकल्प यांच्या बागेत 200 ग्रॅम ते दोन किलो वजनाची आंब्याची फळे लागली आहेत. सहाजिकच उच्चशिक्षित संकल्प यांचा पारंपारिक शेतीला बगल देत आंब्याची बाग लावण्याचा निर्णय त्यांना फायदेशीर ठरला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office