Success Story:- काही तरुण हे खूप मोठ्या प्रमाणावर महत्वकांक्षी असतात व त्यांना जीवनामध्ये खूप मोठे यश मिळवायचे असते. त्यासाठी अशा तरुण तरुणींची कष्ट करायची तसेच संघर्ष व अवघड परिस्थिती मधून मार्ग काढण्याची देखील तयारी असते. तसे पाहायला गेले तर कुठल्याही क्षेत्रांमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला त्या क्षेत्राबद्दलची आवड नंतर त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याकरिता लागणारे कष्ट अखंड मेहनत व जिद्द आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रयत्न मधील सातत्य खूप महत्त्वाचे असते.
सध्या जर आपण भारताचा विचार केला तर सध्याचे युग स्टार्टअप युग आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अनेक स्टार्टअप सुरू झाले असून ते चांगल्या प्रकारे यशस्वी देखील झालेले आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण यश जैन या तरुण उद्योजकाचा विचार केला तर त्यांनी देखील असे स्टार्टअप सुरू केले व त्यांच्या या स्टार्टअप ची उलाढाल कोटी रुपयात आहे.
यश जैन यांची यशोगाथा
यश जैन यांनी वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी निंबसपोस्ट नावाचे स्टार्टअप सुरू केले व सध्या त्याचे संस्थापक आणि सीईओ तेच आहेत. आज त्यांच्या या कंपनीची उलाढाल कोटी रुपयात आहे. भारतातील तरुण उद्योजकांपैकी एक असलेल्या यश जैन यांनी 2018 मध्ये निंबस पोस्ट सुरू केले होते.
त्यावेळी त्यांचे वय अवघे 18 वर्षे होते. ते मूळचे भिलाई छत्तीसगड राज्यातील असून भिलाई शहरांमध्ये औपचारिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले व या दरम्यानच त्यांना मार्केटिंग क्षेत्रातील एका प्रसिद्ध ब्रँड सोबत काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये त्यांनी ई-कॉमर्स शिपिंग इकोसिस्टम मधील एमएसएमई आणि स्टार्टअप समोरील प्रमुख आव्हानांना सामोरे जावे लागले. या मधूनच त्यांना निंबसपोस्ट ई-कॉमर्स कंपनीची कल्पना सुचली व हीच कंपनी आता त्रासमुक्त शिपिंग सेवा पुरवण्यामध्ये महत्त्वाचे काम करते.
ई शिपिंग कॉमर्स कंपन्यांना जे काही रोजचे आव्हाने निर्माण होतात त्यांचे निराकरण करणे हे निंबसपोस्ट या स्टार्टअपचे उद्दिष्ट आहे. निंबसपोस्ट हे स्टार्टअप ग्राहकांपर्यंत लवकरात लवकर पोहोच आणि ग्राहकांचे समाधान यासाठी असलेल्या वचनबद्धतेकरिता ओळखले जाते. निंबस पोस्ट व्यतिरिक्त यश जैन हे डिजिटल विद्याचे मार्केटिंग प्रमुख आणि नेशन कार्ट या ई कॉमर्स सास एप्लीकेशनचे सह संस्थापक असून या माध्यमातून ते निर्यात व्यवसायावर भर देतात.
कोटींची आहे उलाढाल
जर आपण त्यांच्या या स्टार्टअप चा टर्नओव्हर पाहिला तर यश जैन आणि त्यांची एकंदरी टीम यांनी 2023 पर्यंत साडेतीनशे कोटी रुपयांची उलाढाल करण्याचे टार्गेट ठेवले असून 2022 मध्ये निंबसपोस्टने 50 कोटी रुपयांची मजबूत वार्षिक उलाढाल काढली होती. कंपनीच्या या यशामागे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर आणि 500 पेक्षा जास्त इंजिनियर्स आणि लॉजिस्टिक तज्ञांचा समावेश आहे. निंबसपोस्ट या स्टार्टअपचे फेडेक्स, ब्ल्यूडार्ट, एक्सप्रेसबीज आणि शाडोफॅक्स यासारख्या आघाडीच्या वितरण भागीदारांसह दररोज वीस लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार हँडल करते.