छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या मागणीसाठी श्रीरामपूरात बंद यशस्वी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहरातील छत्रपती शिवाजी चौकात बसवावा, या मागणीसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा संघर्ष समितीच्या वतीने काल श्रीरामपूर बंदचे आवाहन करण्यात आले होते.

त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा शहरातील छत्रपती शिवाजी चौकात बसवावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून विविध पक्ष व संघटना करत आहेत.

त्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा संघर्ष समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तिथीनुसार साजरी करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा या मागणीने जोर धरला.

मात्र हा पुतळा संगमनेर रस्त्यावरील गोविंदराव आदिक नाट्यगृहासमोर बसविण्यात येणार असल्याचे समजल्यानंतर समितीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार काल बंदचे आवाहन करण्यात आले होते. काल सकाळपासूनच संपूर्ण शहरात दुकाने बंद होती.

बंदच्या आवाहनाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. कुठेही शांततेचा भंग झाला नाही. पुतळा संगमनेर रोडवर हलविण्यात येणार असल्याची माहिती चुकीची असून ती अफवा असल्याचे शनिवारी नगराध्यक्ष अनुराधा आदिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाहीर केले होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24