ताज्या बातम्या

शेतकऱ्याच्या पोरांचा नांदच खुळा..! शेतकऱ्यांसाठी शोधलं अत्याधुनिक फवारणी यंत्र, वाचा याविषयीं सविस्तर

Published by
Ajay Patil

Successful Farmer: शेती (Farming) हा बारामाही चालणारा व्यवसाय आहे. शेतीमध्ये पिकांच्या वाढीसाठी आणि रोगापासून पिक संरक्षणासाठी नेहमीच वेगवेगळ्या कीटकनाशकांची (Pesticides) फवारणी शेतकरी बांधवांना (Farmer) करावी लागते.

शिवाय अनेक तणनाशकांची आणि बुरशीनाशकांची देखील फवारणी शेतकऱ्यांना करावी लागते. त्यामध्ये असलेले खतरनाक रासायनिक घटकांमुळे अनेकदा फवारणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या आरोग्याला गंभीर परिणाम होतात.

कीटकनाशकाची फवारणी करताना अनेक शेतकरी बांधवांच्या जीवावर बेतल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो. किटकनाशकाची फवारणी करताना उडणारे फवारे शेतकऱ्यांच्या नाकातोंडात जातात आणि अनेक प्रसंगी शेतकऱ्यांना यामुळे हानी पोहचत असते.

शेतकरी बांधवांना फवारणी करताना या समस्येला तोंड द्यावे लागतं असल्याने नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या शेतकऱ्याच्या पोरांनी चक्क अत्याधुनिक फवारणी यंत्र (Spray machine) विकसित केले आहे.

शेतकरी पुत्रांची ही कामगिरी सध्या जिल्ह्यात नव्हे-नव्हे तर संपूर्ण राज्यात (Maharashtra) मोठा चर्चेचा विषय ठरत आहे.पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या (Nashik) चांदवड (Chandwad) येथील एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या काही शेतकरी पुत्रांनी या अत्याधुनिक फवारणी यंत्राची निर्मिती केली आहे.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या पारंपारिक फवारणी यंत्रमध्ये असलेले दोष या अत्याधुनिक फवारणी यंत्रात नसल्याचे सांगितले जात आहे. या अत्याधुनिक फवारणी यंत्राची निर्मिती करणारे सर्व विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत.

त्यामुळे या शेतकरी पुत्रांना शेती व्यवसायातील अडचणी चांगल्याच ठाऊक आहेत. यामुळे या शेतकरी पुत्रांना नेहमीच शेती व्यवसायात काहीतरी जरा हटके करावे असं वाटतं असे.

या अनुषंगाने या शेतकरी पुत्रांनी मल्टिपर्पझ ॲग्रीकल्चर रोबोटची निर्मिती केली. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की हा रोबोट रिमोटवर ऑपेरेट केला जातो आणि याच्या माध्यमातून शेतीतील भरपूर कामे केली जातात.

या रोबोटच्या माध्यमातून शेतकरी बांधव शेतात फवारणी करू शकतात विशेष म्हणजे शेतकरी बांधव बांधावर बसून हा रोबोट चालवू शकतो. याचाच अर्थ आता बांधावर बसून शेतकरी बांधव फवारणीची सर्व कामे करू शकतात.

या यंत्रमुळे साहजिकच शेतकरी कीटकनाशकाच्या संपर्कात येणार नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना विषबाधा व कुठलीच शारिरीक व्याधी होणार नाही.

या शेतकरी पुत्रांनी तयार केलेला हा रोबोट इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणार असून, चार्जिंगनंतर साधारणतः एक तास बागेत फवारणी करू शकतो असा दावा केला जातं आहे.या आधुनिक फवारणी यंत्रात फोर व्हीलर ड्राईव्ह या संकल्पनेचा वापर केला गेला आहे.

हा रोबोट किंवा फवारणी यंत्र चिखलात फसणार नाही. शिवाय या यंत्राच्या माध्यमातून पंप मीटर, गवत कापणे अशी कामे देखील रिमोटच्या साहाय्याने केली जाणार असल्याचे सांगितले जाते.

या आधुनिक रोबोटमुळे शेतकरी शेताच्या बांधावर बसून रिमोटद्वारे हा रोबोट चालवू शकतो आणि आपली शेतीचे कामे करू शकतो. यामुळे शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर टाळता येणार आहे.

म्हणजेच इंधन खर्चाची बचत होणार असून, पिकांची नासाडी टाळता येणार आहे. शिवाय यामुळे वेळेची बचतही होणार असल्याचे सांगितले जातं आहे.

एस एन जे बी महाविद्यालयातील नामदेव पवार, जगदीश गांगुर्डे, अमित कोतवाल, अमोल ठाकरे या शेतकरी पुत्रांनी या रोबोटची निर्मिती केली आहे. यासाठी त्यांना प्रा. एस. पी. इंगळे यांनी मार्गदर्शन केले आहे.

Ajay Patil