ताज्या बातम्या

Successful Farmer: सचिन भावा लई भारी…!! नवयुवक शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी; कलिंगडचे घेतले विक्रमी उत्पादन, झाली लाखोंची कमाई

Published by
Ahmednagarlive24 Office

Successful Farmer: खांदेश म्हटलं म्हणजे सर्वप्रथम आठवतात त्या केळीच्या बागा. विशेषता जळगाव जिल्ह्यात केळीचे सर्वाधिक उत्पादन (Banana Production) घेतले जाते. जिल्ह्यातील तापीचे खोरे म्हणून ओळखले जाणारे यावल तसेच रावेर व आजूबाजूच्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची शेती केली जाते.

असे असले तरी आता या परिसरातील शेतकरी बांधव (Farmers) केळी पिकाला पर्याय पिकाची लागवड करू लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने अद्रक आणि हळद या पिकाची लागवड बघायला मिळते.

मात्र यावल तालुक्याच्या एका अवलिया नवयुवक शेतकऱ्याने पारंपरिक पीक पद्धतीऐवजी हंगामी पिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि चांगले दर्जेदार उत्पादन मिळवून दाखवले आहे. यावलच्या न्हावी येथील नवयुवक शेतकरी सचिन इंगळे

याने काळाच्या ओघात शेती व्यवसायात मोठा बदल करत पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत टरबुजाची लागवड (Watermelon Farming) करून एकरी 30 टन उत्पादन प्राप्त करण्याची किमया साधली आहे.

यामुळे पंचक्रोशीत सचिन इंगळे यांची मोठी चर्चा बघायला मिळत आहे. एवढंच नाही तर सचिनच्या बांधावर शेकडो शेतकरी हजेरी लावून त्यांच्याकडून टरबूज शेतीची कसब आता जाणून घेऊ लागले आहेत.

शेती व्यवसायात (Farming) अपार कष्टाला योग्य नियोजनाची सांगड घातली आणि काळाच्या ओघात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केला तर काय होऊ शकत हे सचिन इंगळे यांनी दाखवून दिले आहे. सचिन यांनी अवघ्या दीड महिन्यात टरबुजाचे एकरी 30 टन एवढे दर्जेदार उत्पादन मिळवले आहे.

यामुळे अल्प कालावधीत सचिन यांनी मिळवलेल्या या दर्जेदार उत्पादनाविषयी जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधव सचिन यांची भेट घेत आहेत. या नेत्रदीपक यशामुळे सचिन यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान बघायला मिळत आहे. सचिन यांनी उत्पादित केलेले टरबुजाचे एक फळ जवळपास 9 किलो वजनी असल्याचे सचिन यांचा दावा आहे.

सचिन इंगळे यांच्या मते, टरबूज शेतीतून त्यांना एकरी दोन ते अडीच लाखांचा नफा मिळाला आहे. पाच एकर केळीच्या बागेत आंतरपीक म्हणून कलिंगडची लागवड करून सचिन यांनी चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले असून सचिन इतर शेतकऱ्यांना देखील आंतरपीक लागवड करण्याचा सल्ला देत आहेत. निश्चितच अल्प कालावधीत काढण्यासाठी तयार होणाऱ्या टरबूज पिकातून सचिन इंगळे त्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे.

Ahmednagarlive24 Office