अशीही कुर्बानी : प्रियकरासोबत नवऱ्याने लावून दिले बायकोचे लग्न!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-आपल्या बायकोचे दुसऱ्यावर प्रेम आहे. हे समजल्यानंतर नवऱ्याने आपल्या बायकोचे लग्न तिचे त्या प्रियकरासोबत लग्न लावून दिले. ही घटना एखाद्या चित्रपटातील नव्हे, तर बिहारमधील भागलपूर येथे प्रत्यक्षात घडली आहे.

सुलतानगंज इथल्या एका मंदिरात नवऱ्याच्या उपस्थितीत बायकोने प्रियकराशी लग्न केलं. लग्नानंतर या नवदाम्पत्याने नवऱ्याचे आशिर्वादही घेतले. उत्तम मंडल याचं लग्न सपना कुमारी नावाच्या महिलेशी झालं होतं.

साधारणपणे 7 वर्षांपूर्वी या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. सपना ही खगडियाची राहणारी होती तर उत्तम हा भालपूर जिल्ह्यातील सुलतानगंजचा रहिवासी आहे. लग्नानंतर हे जोडपं आनंदात राहात होतं, मात्र काही महिन्यांनी या दोघांच्या प्रेमात मिठाचा खडा पडला.

उत्तमच्या घरी आलेल्या एका नातेवाईकाला पाहताच सपना त्याच्या प्रेमात पडली. त्यालाही सपना आवडायला लागली आणि दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले. हे उत्तमला कळालं तेव्हा त्याने सपनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र सपना ऐकायला तयार नव्हती.

सपनाच्या प्रेमसंबंधाबाबत कळाल्यानंतरही उत्तम आणि ती सोबत राहात होते. दरम्यानच्या काळात या दोघांना दोन मुलेही झाली. मुलं झाल्यानंतर सपनाचे मन बदलेल असं उत्तमला वाटत होतं.

मात्र सपनाच्या मनातील प्रियकराबाबतचं प्रेम कमी होण्याऐवजी ते दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं. सासरच्यांपप्रमाणेच माहेरच्या मंडळींनीही सपनाला समजावून सांगितलं, मात्र ती कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

यामुळे उत्तमने तिचं लग्न लावून देण्याचं ठरवलं. उत्तमने सपनाचं लग्न त्याचाच नातेवाईक असलेल्या राजू कुमार याच्याशी लावून दिलं.

सुलतानगंज इथल्या एका मंदिरात सपनाने नवऱ्याच्या उपस्थितीत प्रियकराशी लग्न केलं. लग्नानंतर सपना आणि राजूने उत्तमचे आशिर्वादही घेतले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

 

अहमदनगर लाईव्ह 24