Valentine gift concept.

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून एक धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे बायकोचे विवाहबाह्य संबंध नवर्‍यास समजल्यानंतर ते असहाय्य झाल्याने नवऱ्याने आत्महत्या केली आहे, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे

प्रेम करणार्‍या पतीने थेट टोकाचे पाऊल उचलले ! उच्चशिक्षित अश्या ह्या तरुणीने फक्त नवराच नव्हेत तर प्रियकराला देखील धोका देऊन अन्य ठिकाणी मशगुल झाल्याचे पुरावे एका प्रियकराने तिच्या नवर्‍यास व्हाटसअ‍ॅपवर पाठविल्याने आपल्या पत्नीवर प्रेम करणार्‍या पतीने थेट टोकाचे पाऊल उचलले आहे.

प्रियकरासह पाच जणांवर गुन्हा दाखल  :- ही घटना संगमनेर तालुक्यातील निमज परिसरात घडली असून याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात प्रियकरासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

तरुणाने हकनाक जीव गमविल्याचे दु:ख :- या घटनेमुळे, आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करणार्‍या तरुणाने हकनाक जीव गमविल्याचे दु:ख व्यक्त होत असून दाखल झालेल्या फिर्यादीत अनेक आरोप करण्यात आले आहेत.

घरच्यांनी त्यास बेदम मारहाण केली होती… 

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील एका तरुणाचा संगमनेर तालुक्यातील निमज परिसरात राहणार्‍या एका तरुणीशी विवाह झाला होता. हे दाम्पत्य नाशिकमध्ये स्थायिक होते.

Advertisement

दोघांना एक मुलगा देखील झाला होता. मात्र, मुलगी सतत मोबाईलवर बोलणे, कायम त्यात डोकं खुपसून बसणे, चॅटींग आणि व्हिडिओ कॉल यामुळे, मुलगा पुरता वैतागला होता.

याच कारणाहून या दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याने मुलगी तिच्या गावी निघुन गेली होती. मात्र, जेव्हा हा मुलगा तिला आणण्यासाठी गेला तेव्हा मुलीच्या घरच्यांनी त्यास बेदम मारहाण केली.

पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा देखील दाखल

Advertisement

याप्रकरणी दि. 7 ऑक्टोबर 2018 रोजी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा देखील दाखल आहे. मात्र, यात काही व्यक्तींनी मध्यस्ती केली आणि मुलगी पुन्हा नांदण्यासाठी नाशिकला आली. मात्र, तरी देखील मुलीचे बे चे पाढे कायम ठेवले.

तुझी पत्नी माहेरी आल्यानंतर आमच्याशी संबंध ठेवते !

दरम्यान, यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला आणि ही मुलगी दि. 11 जुलै 2021 रोजी मुलासह पुन्हा तिच्या माहेरी निघून गेली. त्यानंतर दि. 18 जुलै 2021 रोजी या मुलाच्या (नवरा) मोबाईलवर मेसेज आले. की, तुझ्या पत्नीचे माझ्यासह अन्य मुलांशी प्रेमसंबंध आहे. तुझी पत्नी माहेरी आल्यानंतर आमच्याशी संबंध ठेवते.

Advertisement

नवर्‍यावर अनेक आरोप प्रत्यारोप

ती मला धोका देऊन दुसर्‍या मुलासोबत गेल्याने मी हे सर्व तुम्हाला सांगत आहे. तशा प्रकारचे काही पुरावे देखील संबंधित दोन नंबरंहून नवर्‍यास टाकण्यात आले होते. त्यामुळे, हा जाब विचारण्यासाठी तो तेथे गेला होता.मात्र, तिनेच उलट या तरुणावर तथा नवर्‍यावर अनेक आरोप प्रत्यारोप केले.

मुलाकडे घटस्फोटाची मागणी

Advertisement

दरम्यान, ही केस आता आपल्या हाताबाहेर जात आहे. जेव्हा हे मुलीच्या लक्षात आले. तेव्हा तिने या मुलाकडे घटस्फोटाची मागणी केली. तर आपल्या नवर्‍यास अपमानीत करुन तेथून काढून दिले.

तब्बल 5 लाख रुपयांची लुट

त्या दिवसापासून त्याच्या आयुष्याने अस्वस्थता धारण केली होती. त्यापुर्वी मुलीकडच्या लोकांनी याच्याकडून तब्बल 5 लाख रुपयांची लुट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तरी देखील या तरुणाचे आपल्या पत्नीवर नित्तांत प्रेम होते.

Advertisement

पत्नीच्या वागण्याला कंटाळून…

मात्र, पत्नीच्या असल्या वागण्याला कंटाळून तो वैराग्य धारण करुन बसला होता. तर पत्नीच्या असल्या कर्माची माहिती देणार्‍या संबंधित मोबाईल नंबर बाबत त्याने सायबर शाखा नाशिक यांच्याकडे दि. दि. 10 ऑगस्ट 2021 रोजी तक्रार देखील नोंदविलेली आहे.

त्यानंतर देखील या तरुणास दि. 21 ऑगस्ट 2021 रोजी काही चॅटींग आणि एक व्हिडिओ क्लिप आली होती.व त्यात धमकी देण्यात आली होती.

Advertisement

आपल्याला जगायचे नाही असा त्याने निर्धार केला…

अश्लिल प्रकाराचे मेसेज आणि क्लिप पाहुन या तरुणाला प्रचंड घृणा निर्माण झाली होती. आता काही झालं तरी आपल्याला जगायचे नाही. असा त्याने निर्धार केला होता.

किटकनाशक विषारी औषध घेऊन…

Advertisement

दरम्यान, दि. 23 ऑगस्ट 2021 रोजी रात्री या तरुणास त्याच्या मानसिक वेदना असहाय्य झाल्या आणि त्याने रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास मोनसुल हे किटकनाशक विषारी औषध घेऊन थेट निमज गाठले. चक्क आपल्या पत्नीस आणि तिला पाठीशी घालणार्‍या तिच्या पालकांना कंटाळून त्याने हे विषारी औषध प्राषण केले.

आठ दिवस उलटले तरी देखील तरुण शुद्धीवर आला नाही !

त्यानंतर, सासु सासर्‍यांसह पत्नीला घाम फुटला. त्यांनी तत्काळ आपल्या जावयास संगमनेर शहरातील एका रुग्णालयात दाखल केले. मात्र, आठ दिवस उलटले तरी देखील तरुण शुद्धीवर आला नाही.

Advertisement

त्यानंतर त्यास घोटी येथील एका रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तरी देखील त्याची मृत्युशी झुंज यशस्वी ठरली नाही. अखेर त्याने 31 ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेऊन या गुंतागुंतीच्या आयुष्याचा निरोप घेतला.