अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-साखर सम्राटांनी आपापल्या कार्यक्षेञात तसेच तालुक्यात कोविड सेंटर उभारून समाजाप्रती असलेली बांधिलकी जोपासावी.
असे मत पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी येथील स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव डांभे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. कोरोना संकट हे नैसर्गिक असून सर्वांनी एकजुटीने मुकाबला करायला हवा,
कोरोना संकटात राजकारण न करता समाजाप्रती असलेली बांधिलकी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही जोपासावी व गोर गरीब जनतेला दिलासा द्यावा कोरोना संकट हे जागतिक असून, भेदभाव नाही.
म्हणून जनतेला मदत होईल, सरकारला मदत होईल, आरोग्य विभागावरील ताण कमी होईल परिणामी बेड ,ऑक्सिजन,व इतर वैद्यकीय मदत मिळण्यास मदत होईल तसेच जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यूने थैमान घातले आहे.
कोरोनाने नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत.दिवसेंदिवस ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.अमर धाममध्ये अंत्यविधीसाठी वेटींग असते हे चित्र अतिशय भयावह आहे.
लोकप्रतिनिधीनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणार आहात का? आणि म्हणून लोकप्रतिनिधी,व साखर कारखान्यांनीही आपल्या परीसरात कोविडं सेंटर उभारावे अशा प्रकारारचे निवेदन पञ ईमेल द्वारे
डॉ. कृषिराज टकले यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या सदस्यांनी पञ साखर सहसंचालक कार्यालय व परीसरातील साखर कारखान्यांना पाठवले आहे. असे अंकुशराव डांभे यांनी सांगितले.