अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, चितळी, ढवळेवाडी परीसरात ऊस तोड मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.
तेरा, चौदा महीने होवूनही अजुनही ऊस शेतातच उभा असून लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत. ऊस हे महाराष्ट्राची ओळख असलेले नगदी पीक आहे.
या एका पिकाने अनेक शेतक ऱ्यांची घरे उभी केली. तसेच यातून उभ्या राहिलेल्या कारखानदारी आणि अन्य सेवांमधूनही मोठा रोजगार, आर्थिक उलाढाल घडवली.
या पिकाने ऊस उत्पादकांच्या जोडीनेच ऊस तोडणी मजुरांचाही एक वर्ग तयार झाला आहे. एकमेकांशी जोडलेल्या या घटकांमधील या तोडणी यंत्रणेच्या अडवणुकीमुळे यंदाचा ऊस शिवारातच लटकू लागला आहे.
शेतीविषयक मुद्द्यांची चर्चा होते तेव्हा स्वाभाविकता ऊस शेतीचा मुद्दा अग्रस्थानी राहताना दिसतो.
त्याची कारणेही अनेक उसाचे भलेमोठे अर्थकारण, शेतकऱ्यांची सुधारलेली सांपत्तिक स्थिती, आकारमानाच्या तुलनेने सर्वाधिक पाणी पिणारी शेती,
त्यासाठी पाण्याची पळवापळवी आणि त्याहून सरस ऊस शेतीचे राजकारण उसाच्या हमीभावामुळे शेतकऱ्यांचा खिसा खुळखुळताना दिसत असला तरी त्याला छिद्रेही तितकीच दिसत आहेत.