वरिष्ठांच्या जाचास कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- नगर-औरंगाबाद रोडवर झाडीत एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्रतीक बाळासाहेब काळे (वय 27 वर्ष) असे या तरुणाचे नाव असून त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आत्महत्येपूर्वी त्याने ज्या महाविद्यालयात तो नोकरीला होता तेथील वरिष्ठ देशमुख यांचे नाव घेत एक व्हिडिओ व्हायरल करत आरोप केले आहेत.

जिल्ह्यातील एका मोठे नाव असलेल्या राजकीय नेत्याचा पर्सनल सेक्रेटरी म्हणूनही त्याने या पूर्वी काम केल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्याच्या अंगझडतीत तो काम करत असलेल्या संस्थेचे ओळखपत्र मिळाले आहेत. या प्रकरणी मोठी चर्चा होत असून एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Ahmednagarlive24 Office