file photo

राहुरी तालुक्याच्या वरवंडी येथील नितीन भालेराव (वय ३८ ) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन रोजंदारीचे काम करत होता.

प्रातर्विधीनिमित्त नितीन कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात गेला. मात्र परतला नाही. मुलगा आर्यन नितीनला पहायला गेला असता त्याला नितीन एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

या घटनेची खबर परिसरात पसरताच गावकरी व नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिस कर्मचारी संजय जाधव यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यास मदतकार्य केले. शव विच्छेदनानंतर नितीनचा मृतदेह त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.