अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु येथील १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेने सावळी विहीर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सादर कुटुंब हे गरीब असून मुलीचे आई वडील मोल मजुरीसाठी बाहेर गेले होते. घरी मोठी बहीण व लहान भाऊ होता. ते बाहेर गेले असता मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लहान भाऊ घरात आला असता त्याने ही घटना बघितली. तात्काळ शेजारच्या लोकांना आवाज दिला.
पोलीस पाटील सुरेश वाघमारे, बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब जपे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला खबर दिली. शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांचे ताब्यात देण्यात आला.याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे.मुलीने आत्महत्या का केली याचा तपास शिर्डी पोलीस करीत आहे.