अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- राुहरी तालुक्यातील टाकळीमिया येथून बुधवार दि. १ सप्टेंबरला बेपत्ता झालेल्या माय लेकींचे मृतदेह टाकळीमियॉ येथील विहिरीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले आहेत. या घटनेतील मयत विद्या दिलीप कडू वय २७ ही विवाहिता व ४ वर्षाची मुलगी सिद्धी राहणार लाख (कडुवस्ती) या दोघी मायलेकी १ सप्टेंबरला घरातून बेपत्ता झाल्या होत्या.

याबाबत पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. नातेवाईक मायलेकींचा शोध घेत होते. गुरूवारी सायंकाळी पंचवटी भागात एका विहिरीत सिद्धीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. स्थानिक रहिवासी व विद्या कडूच्या नातेवाईकांनी विद्याचा शोध घेतला. रात्री १० वाजता विद्याचा मृतदेह गळाला लागला.

शवविच्छेदनानंतर या मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवार दि 1 तारखेला तिला श्रीरामपूर येथे दवाखान्यात नेण्याचे ठरले होते. तिचे वडील हे रिक्षाला डिझेल टाकण्यासाठी गावात गेले होते व तिची आई त्यांच्यासाठी डबा बनवत होती.

मात्र विद्या ही या औषधोपचार व इंजेक्शनला पूर्णपणे वैतागली होती. तिने संधी साधून आपल्या लहान चिमुकलीला घेऊन जवळच असलेल्या विहीरीत उडी टाकली. त्यानंतर तिचा सर्वत्र शोध सुरू झाला सोशल मीडियावर फोटो व्हायरल केला. मात्र तिचा शोध लागला नाही.

त्यामुळे बुधवारी रात्री देवळाली प्रवरा पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल केली. तरीही सर्वत्र शोध सुरू होता. काल (गुरूवार) सायंकाळी विहीरीत चिमुकल्या सिध्दीचा मृतदेह तरंगताना आढळून आला परंतु तिची आई विद्या ही वर आली नसल्याने विहिरीतील पाणी उपसण्यासाठी ट्रॅक्टरचे पंप मागवण्यात आले.

त्याच प्रमाणे गळ टाकण्यात आले. सुमारे तिन तासांच्या प्रयत्नानंतर गळाला तिचा मृतदेह लागला. दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रात्री उशीरा पाठवण्यात आले.