अहमदनगर जिल्ह्यात आत्महत्या सत्र सुरुच; लॅाकडाऊन मुळे…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील युवक रवींद्र बबन गरुड ,वय -सत्तावीस वर्ष याने काल त्याच्या राहत्या घरावरील पत्र्याच्या रॅाडला वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

रवींद्र याने लॅाकडाऊन मुळे कामधंदा नसल्याने आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. रवींद्र यांच्या पश्चात आई,एक भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे.

त्याच्या अकाली निधनाने गोंडेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रीरामपूर शहर व तालुक्यात लॅाक डाऊन मुळे काम धंदा गेल्याने आत्तापर्यंत जवळपास चार ते पाच लोकांनी आपली जीवन यात्रा संपवल्याची प्राथमिक माहिती आहे.

तरी सरकार लॅाकडाऊन उघडण्यासाठी आजुन किती तरुणांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहे असा सवाल गोर-गरीब जनतेतुन उमटत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24