अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  नगर मनमाड महामार्गावर प्रचंड मोठ मोठे खड्डे पडले असून या रस्त्यावर प्रवास करताना चांगला रस्ता शोधूनही सापडणार नाही अशी दैनावस्था झाली आहे. दुचाकी वाहन चालकांना तारेवरची कसरत करून आपली वाहने चालवावी लागत आहेत.

पावसाच्या कारणास्तव रस्त्याच्या कामाला विलंब होत असेल परंतु येत्या पंधरा दिवसांत काम सुरू होईल असा विश्वास नगर दक्षिणचे खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्यानंतरही काम सुरू न झाल्यास ठेकेदाराला पकडून तोंडाला काळे फासू त्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा विखेंनी दिला आहे.

नगर मनमाड महामार्गावर आजही रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे समजणे अशक्य झाले आहे. दुचाकी वाहन चालकांना तारेवरची कसरत करून आपली वाहने चालवावी लागत आहेत. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणार्‍या नगर-मनमाड महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

दरम्यान खड्ड्यांसाठी वारंवार चर्चेत असलेल्या नगर मनमाड महामार्गासाठी खा. डॉ सुजय विखेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून या महामार्गासाठी 450 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. तशी वर्कऑर्डरदेखील दिली गेली आहे.

पावसाळ्या अभावी कामाला उशीर होत आहे, तोपर्यंत खड्डेे बुजवण्यासाठी विखे पाटील यांनी आदेश दिले आहेत असे सांगत येत्या पंधरा दिवसांत सदरच्या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा त्यांनी दिला.