सुजय विखे म्हणाले मला बाकी विषयावर बोलण्यात वेळ घालायचा नाही….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-मला पंधरा हजाराने तालुक्यात मताधिक्य आहे. त्यामुळे मला श्रेयवादात पडण्यापेक्षा लाभार्थी शेतक-यांना न्याय देण्याची भूमिका आहे.

असे प्रतिपादन खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केले आहे. पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे पिंपळगाव जोगे पाणी प्रश्नावर अधिकारी व लाभार्थी शेतकरी यांची विखे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना विखे म्हणाले, आपला लढा आपणचं उभारला पाहिले. शेतक-यांची पाणी वाटप संस्था गरजेची आहे.

पाटबंधारे विभागाकडे कर्मचारी वर्ग कमी असेल तर माझी यंत्रणा दिली जाईल. जसे श्रीगोंदामध्ये केले तोच पॅटर्न आपण पारनेरमध्ये करू व शेतक-यांचा पाणी प्रश्न सोडवू.

तसेच टेलपासून टेकपर्यंत उच्च दाबाने पाणी आणण्याचे काम माझे आहे. मला बाकी विषयावर बोलण्यात वेळ घालायचा नाही.

लाभार्थी शेतकरी वंचित राहता कामा नये हिच भूमिका आपली आहे. समाजाचे प्रश्न सोडले म्हणजे मी समाधानी आहे असे वाटले पाहिजे.

मी जनतेचा टाळ्या वाजून घेणारा खासदार मुळीच नाही. यांची जाणिव तुम्हाला भविष्यात येईल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24