सुजित झावरे पाटलांचा खा. सुजय विखेंवर भरोसा ! खासदारकीची मोठी जबाबदारी खांद्यावर घेत आमदारकीचाही घेतला शब्द

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

MP Sujay Vikhe : सध्या लोकसभेचे वारे वाहत आहे. अहमदनगरची निवडणुकीची लढत खा. सुजय विखे व आ. निलेश लंके यांच्यात होईल असे चित्र जवळपास स्पष्ट असतानाच आता खा. सुजय विखे यांनी आपापले शिलेदार जमवायला सुरवात केली आहे. त्यातच आता पारनेर मतदार संघाच्या विधानसभेचीही तयारी आतापासूनच सुरु झाल्याचे चित्र आहे.

आ. निलेश लंके हे सध्या पारनेरमधून आमदार आहेत. परंतु आता जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी विधानसभेसाठी फिल्डिंग लावायला सुरवात केल्याचे चित्र आहे. खासदारकीचा विखे यांना मदत करण्याच्या मोबदल्यात त्यांनी विधानसभेला आम्हाला मदत करा असे सूतोवाच सुजित झावरे पाटील यांच्या समर्थकांनी केल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

23 मार्च रोजी पारनेरमध्ये सुजित झावरे पाटील यांचा वाढदिवस व कार्यकर्त्यांना मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. यावेळी स्वतः खा. सुजय विखे यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी काही मान्यवरांनी व समर्थकांनी आपले मनोगत भाषनासवरे व्यक्त करत भावना व्यक्त केल्या.

समर्थकांकडून विधानसभेची तयारी
सुजित झावरे पाटील यांच्या एका समर्थकाने यावेळी म्हटले की, स्वर्गीय दादांनी तालुक्यातील सर्व लोकांना सोबत घेत राष्ट्रवादी वाढवली परंतु ते गेल्यानंतर सुजित पाटील व आम्हाला पक्षाने अडचणीत आणण्याचे काम केले असून यावेळी आता विखे यांना मदत करून तालुक्यातून 25 ते 30 हजाराचं लीड मिळवून देऊ परंतु विधानसभेला आम्हाला तुम्ही मदत करावी लागेल अशी गळच यावेळी समर्थकांनी घातली.

तडजोडीचे राजकारण
यावेळी काही समर्थकांनी म्हटले की, आम्ही कायमच सुजित पाटीलांना साथ देत आलो असून ही साथ यापुढेही राहील परंतु आता सध्याच्या राजकारणात तड‌जोड कराव्या लागणार आहेत. विकासकामांसाठी सुजय विखे अग्रेसर असून गल्लीपासुन दिल्लीपर्यंत चांगले वजन असल्याने तालुक्याला त्यांनी भरीव निधी दिला व भविष्यातही देतील. त्यामुळे खा. विखे याना मदत करावी तेही आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाहीत असे त्यांनी म्हटले.

..तर आ. लंके यांना टक्कर
जर लोकसभेला आ. लंके उभे राहिले नाहीत तर तर ते विधानसभेला उभे राहतील. त्यावेळी त्यांना तंगडी टक्कर पारनेरमधून मिळेल अशी चर्चा सध्या रंगली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24