सुनेला मारहाण, छळ करून 1 कोटीची मागणी काँग्रेस आमदारासह मुलगा, मुलीवर गुन्हा दाखल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- सुनेला मारहाण, छळ करून 1 कोटीची मागणी केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्यासह मुलगा राजेश आणि मुलगी टीना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कराड शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. आदिती राजेश पाटील यांनी याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सुनेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आमदार पी.एन. पाटील यांच्यासह त्यांच्या मुलगा व मुलगीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सौ. अदिती राजेश पाटील यांनी कराड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अदिती ही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची पुतणी आहे.

आमदारांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहेयाबाबत पोलिसांनी सांगितले की, दोन वर्षापूर्वी पी.एन. पाटील यांचा मुलगा राजेश व अदिती यांचा मोठ्या थाटामाटात कोल्हापुरात विवाह संपन्न झाला.

लग्नानंतर आपला सासरी छळ करतानाच एक कोटीची मागणी केल्याचे अदिती यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सासरे पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी एन. पाटील, पती राजेश पांडुरंग पाटील व नणंद सौ. टीना महेश पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पी.एन. पाटील हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. बाळासाहेब पाटील सहकार मंत्री तर अदितीचे वडिल सुभाष पाटील हेदेखील राजकारणात ज्येष्ठ नेते आहेत. गेले दोन तीन महिने या कुटुंबात वाद सुरू होता. तो मिटविण्यासाठी राजकीय पातळीवर समझोता करण्याचे प्रयत्न झाले. पण त्यात यश आले नाही.