सासऱ्याकडून सुनेला शरीर सुखाची मागणी,नंतर झाले असे काही..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील दक्षिण भागातील एका गावात चक्क सासऱ्याने सुनेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी सासऱ्यावर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पती व दोन मुलांसह राहणाऱ्या महिलेची शेतीवर उपजीविका आहे. अंगावर कोड फुटलेला असल्यामुळे घरातील लोक तिला कायम त्रास देतात. २५ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता फिर्यादी व तिची मुले जेवण करून झोपण्यासाठी गेले. त्यावेळी सासरा दारू पिऊन सुनेजवळ आला व तिच्याकडे त्याने शरीर सुखाची मागणी केली.

पीडित महिलेने त्याला नकार देऊन त्याला घराबाहेर काढून दिले. जाताना सासऱ्याने सुनेचा विनयभंग करून मारहाण केली. बाहेरगावी गेलेला पती घरी आल्यावर हा प्रकार पत्नीने पतीला सांगितल्यानंतर फिर्यादीचे वडिलाने श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास कॉन्स्टेबल लता पुराने करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24