वृत्तसंस्था :- फेसबुकवर 23 मिलीयन फॉलोअर्स असलेली सनी लियोनी बॉलिवूडची सर्वाधिक एंगेजिंग अभिनेत्री बनलीय.
आपल्या सोशल मीडिया अपडेट्स आणि ट्रेंडी लुक्सच्यामुळे सनीने आपल्या चाहत्यांवर मोहिनी घातलेली दिसून येतेय.
स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस’ बनलेल्या सनी लियोनीने 100 गुणांसह बाकी सर्व बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकून नंबर वन स्थान पटकावले आहे.
अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट बनवली आहे.
सनी लियोनीचे दुबई टूरचे फोटो आणि व्हिडीयोज, तसेच आपल्या कुटूंबियांसोबतच फोटो, आपल्या स्टाइलिश फोटोशूट्स
आणि डान्स रिहर्सल्सचे व्हिडीयो ह्यामूळे सनीच्या चाहत्यांची तिच्या फेसबुक अकाउंटवर एंगेजमेंन्ट वाढलेली दिसून आलीय.