सुप्याचा बंद आठवडे बाजार ठरतोय शेतकऱ्यांसह पशुपालकांसाठी डोकेदुखी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  राज्यातील कोरोनाच सावट हळूहळू पुन्हा एकदा कमी होऊ लागले आहे. तसेच राज्यातील निर्बंध देखील शिथिल करण्यात येऊ लागले आहे. यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

यातच सर्व गोष्टी सुरु झाल्या असल्याने सुपा येथील आठवडे बाजार सुरु करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

सुपा येथील सर्वात मोठा आठवडे बाजार लवकर सुरू होण्याची प्रतीक्षा नागरिक तसेच व्यावसायिकांना आहे. बाजार बंद असल्याने शेतमाल तसेच मेंढ्यांचे दर कमी दिले जात असल्याने शेतकरी व मेंंढपाळांचे नुकसान हेात आहे.

अगोदरच करोनामुळे शेतकरी व मजूर यांचे अर्थकारण बिघडले आहे. हा बाजार चालू झाला तर दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे.

दरम्यान करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव शासनाने सर्व व्यापारी बाजारपेठा आठवडे बाजार बंद केले आहेत. यात सुपा येथील शेळी-मेंढी बाजार व आठवडे तरकारी बाजारही बंद करण्यात आला आहे.

दोन वर्षांपासून आठवडे बाजार बंद असल्याने शेतकरी शेळी व मेढी विक्रेत्यांची मोठी अडचण झाली आहे. करोनामुळे आठवडे बाजार बंद झाल्याने शेतकरी ते ग्राहक ही साखळी तुटली आहे.

आठवडे बाजार चालू झाला, तर या दोन्हीही घटकांना दिलासा मिळेल. आता थोडेफार वातावरण निवळत असताना आठवडे बाजार सुरू झाल्यास शेतकरी व इतर सामान्य वर्गाला थोडा दिलासा मिळेल.