रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील पुरवणी दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात दाखल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील पुरवणी दोषारोपपत्र आज पारनेर न्यायालयात दाखल केले गेले आहे.

सुमोर 300 पानांचे हे पुरवणी दोषारोपपत्र असून यामध्ये मुख्य आरोपी बाळ बोठेसह त्याला मदत करणार्‍या अन्य सहा जणांविरूद्ध दोषरोप ठेवण्यात आला आहे.

आरोपी बोठे आणि रेखा जरे यांचे प्रेम प्रकरण होते. यातून रेखा जरे यांनी आपली बदनामी करू नये म्हणून आरोपी बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली.

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरूवातील पाच आरोपींना अटक केली होती.

अटक केलेल्या आरोपींकडून हत्याकांडामागे मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याची माहिती समोर आली. हत्या झाल्यानंतर बोठे पसार झाला होता. त्यामुळे सुरूवातीला पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींविरूद्ध पारनेरच्या न्यायालयात 720 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते.

बोठे याला 102 दिवसांनंतर हैदराबादमधील बिलालनगर परिसरातून अटक केली. या अटकेला येत्या 10 जून रोजी 90 दिवस पूर्ण होत आहे.

आरोपी बाळ बोठे याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे तपास केला. नेमकी ही घटना कशी घडली? बोठे याने जरे यांची हत्या का केली? याची माहिती बोठे याने पोलिसांना दिली आहे.

बोठे याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्याचा शोध घेतला आहे. तसेच आरोपी बोठे याला मदत करणार्‍या 25 जणांचे जबाब आज दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात नोंदविण्यात आले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24