ताज्या बातम्या

गद्दारांना क्षमा नाही, श्रीरामपुरात काँग्रेस नेत्याचा उद्धव ठाकरेंना सपोर्ट

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांकडून आपआपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली जात असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाचे बॅनर लावले आहेत.

श्रीरामपूर शहरात काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा विद्यमान शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालयाजवळ हे बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर ‘साहेब गद्दारांना क्षमा नाही, आय सपोर्ट उद्धव ठाकरे’ असा मजकूर लिहिलेला आहे.

भगव्या रंगाच्या या बॅनरवर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत जयंत ससाणे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शहराध्यक्ष संजय संजय छल्लारे यांनी गळ्यात भगवे उपरणे घातलेला फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे.

सोशल मीडियावर तर भाजप कार्यकर्ते बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्ट करत आहेत. तर आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.

Ahmednagarlive24 Office