आ सुरेश धस यांचा नगरमध्ये तीव्र निषेध

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  ना. विजय वडेट्टीवार यांनी बीड मध्ये येऊन दाखवावं अशी आव्हानात्मक भाषा वापरून आ. सुरेश धस यांनी आक्षेपार्ह विधान केले.

त्यांचे हे विधान अक्षम्य असून ओबीसी व्ही जे एन टी च्या सर्व संघटना नाराज झाल्या असून त्या विधानाचा तीव्र निषेध करीत आहोत असे ओ. बी.सी. बाराबलुतेदार महासंघाच्या महिला शहराध्यक्षा अनुरिता झगडे यांनी सभेत निषेधाचा ठराव मांडतांना सांगितले.

ओबीसी व्ही जे एन टी जनमोर्च्याच्या नगर शहर जिल्हा शाखेच्या वतीने आ.धस यांच्या निषेधार्थ सभा घेण्यात आली सभेनंतर सर्वांनी रस्त्यावर येऊन धस यांच्या विरोधात निर्देशने केली.या निषेध सभेत श्रीमती झगडे बोलत होत्या.

अध्यक्ष स्थानी जनमोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ होते. जनमोर्च्याचे उपाध्यक्ष रमेश सानप यांनी आपल्या भाषणात “आ.धस हे ओ बी सी च्या मतांवर निवडून येतात तर, आजच त्यांना ओबीसींबद्दल पोटशूळ का उठला?”

असा सवाल उपस्थित करुन ते पुढे म्हणाले ,”कि, त्यांचा बोलविता धनी दुसरा कोणी आहे का? हे तपासावे लागेल. राज्यभरात मराठा आरक्षणासाठी जी जी आंदोलने झाली त्या त्या वेळी ओ बी सी समाजाने मराठा आरक्षणाला पाठिंबा देत.

मोठी उपस्थिती दार्शविली होती हे धस यांना माहिती नाही का? “असा सवालही उपस्थित केला. जनमोर्च्याचे शहर चिटणीस फिरोज खान यांनी “ओ.बी.सींच्या मतावर निवडून येणारे आ.धस यांनी आमचे नेते विजय वड्डेटीवार यांना बीड मध्ये येऊनच दाखवा असे जे विधान केले

आहे त्याचा ओ.बी.सीं. समाजात तीव्र प्रतिक्रिया असून आ.धस ज्यावेळी नगर मध्ये येतील तेव्हा त्यांच्या समोर हि तीव्र भावना व्यक्त झाल्या शिवाय राहणार नाही. ” अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ म्हणाले

“ओ.बी.सीं. नेत्यांबद्दल आक्षेपार्ह विधान आ. धस यांनी केल्याने आम्हा कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र झाल्या असून त्यांचा उद्रेक होण्या अगोदर आ.धस यांनी आपले विधान मागे घ्यावे अन्यथा त्याचे पडसाद राज्यभर उमटल्याशिवाय राहणार नाही.

“असा इशारा देऊन ते पुढे म्हणाले, “ओ.बी.सीं. समाजाला एकत्र करत उपेक्षितांचे प्रश्न उपस्थित करणारे राज्याचे मंत्री विजय वड्डेटीवार हे ओ.बी.सीं. व्ही जे एन टी चे हृदयसम्राट आहेत.

त्यांची हि चळवळ उपेक्षितांना न्याय देणारी असून ते कोणत्याही संघटना,समाज,पक्ष, याच्या विरोधात नाहीत तरीही त्यांना नाहक विरोध होतो हि बाब दुर्दैवाची आहे,” श्री. भुजबळ पुढे म्हणाले “ओ बी सी, व्ही जे -एन टी जनमोर्च्याचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी राज्यात जी संघटित शक्ती ना वड्डेटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली उभी केली

ती चळवळ नवा इतिहास घडवल्या शिवाय राहणार नाही. हे आ. धस यांनी लक्षात ठेवावं असे ठणकाऊन सांगितले. यावेळी माजी नगरसेवक सुनील भिंगारे, जनमोर्च्याच्या महिला जिल्हाध्यक्ष सुषमा पडोळे, उपाध्यक्ष मदन पालवे, सेक्रेटरी अनिल इवळे, सरचिटणीस शशिकांत पवार,

बाराबलुतेदार चे जिल्हाध्यक्ष माउली गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष आर्यन गिरमे, चिटणीस संजय आव्हाड, बाराबलुतदारचे शहराध्यक्ष शामराव औटी, सरचिटणीस संजय सागावकर, सदस्य गौरव ढोणे, विनोद पुंड,रमेश कदम,संदीप घुले,राजेंद्र पडोळे,माजी पोलीस निरीक्षण एम आय शेख, मुन्नाशेठ चमडेवाला,

जालिंदर बोरुडे आदींनी आ.धस यांचा निषेध करुन ना. वड्डेटीवार यांचे समर्थन केले. हि सभा व निदर्शने कोरोना नियमांचे पालन करून करण्यात आली.

अहमदनगर लाईव्ह 24