अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- सोनईत कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. शासन नियमांचे उल्लंघन केले जात आहे. रुग्णवाढीची गंभीरता लक्षात घेवून नियम तोडत असलेल्या व्यावसायिकांवर धडक कारवाई केली जात आहे.
दरम्यान नुकतेच सोनईमध्ये ठरवून दिलेल्या वेळेनंतरही व्यवसाय करत असलेल्या दहा दुकानांवर सोनई पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. सोनईतील व्यापारीपेठ व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. व्यावसायास सकाळी 11 वाजेपर्यंत परवानगी असताना दिवसभर चोरुन व्यावसाय होत होता.
याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे व पथकाने दिवसभर विशेष मोहीम राबवून दहा जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. सोनई पोलिसांनी व्यावसायिक विजय विश्वनाथ गवळी, वैभव संजय दरंदले, ज्ञानेश्वर काशिनाथ वैरागर, अक्षय बाळासाहेब वाजे,
कैलास रामभाऊ पालवे, राहुल शरद तवले ,सोपान कोंडीराम गिऱ्हे, अक्षय बबनलाल भळगट, आकाश राजेंद्र भळगट, आकाश कारभारी डफाळ यांच्या आस्थापनांवर जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कारवाई केली.