Maharashtra Politics : “जितेंद्र आव्हाडांना निलंबित करा” भाजप नेत्याचं शरद पवारांना आवाहन

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी प्रेक्षकांना मारहाण करण्याचा आरोप करत त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर करण्यात आला आहे. मात्र आता पुन्हा एकदा एका महिलेने त्यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया देत थेट शरद पवार यांनाच आवाहन केले आहे. आव्हाडांचा राजीनामा घ्या असे बावनकुळे यांनी म्हंटले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राष्ट्रवादीत नैतिकता असेल तर राष्ट्रवादीने बावनकुळे यांचं निलंबन करायलाच हवं. अशा घटना होत राहतात असं बोलून चालणार नाही.

आव्हाडांना आमदारकीचा राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी तो द्यावा. अजित पवार आणि शरद पवार आव्हाडांचा राजीनामा घेणार का? असा सवालही त्यांनी केला आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, कुणी आव्हाड यांचं समर्थन करत असेल तर त्यांना पण गुन्ह्यात घ्यायला हवं. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अशा प्रतिक्रियेमुळे राज्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी पवार कुटुंबियावरही टीका केली आहे. ते म्हणाले, पवार कुटुंबियांनी बारामतीमध्ये 60 वर्षे सत्ता केली. सरकार चालवलं. तर त्यांनी उपकार केले नाहीत.

बारामतीत दहशत आहे. आता गेलेले शिंदेसोबत गेलेल्या आमदारांमध्ये दहशत नव्हती. त्यांना शिंदेंचं नेतृत्व आवडलं त्यामुळे ते शिंदेंसोबत गेले, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे.