अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- ग्रामपंचायतीच्या विद्युत कामाच्या अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिकेबाबत मागणी करून ते तपासणीसाठी उपलब्ध करून दिले नाही.
तसेच बेलापूर ग्रामपंचायतीच्या विद्युत कामाची तपासणी केली असता त्यात तफावत आढळून आल्याने जिल्हा परिषदेचे विद्युत विभागाचे शाखा अभियंता बी.बी. चौधर यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
शाखा अभियंता बी.बी. चौधर हे नगरला विद्युत विभागात शाखा अभियंता पदावर कार्यरत आहेत. बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील ग्रामपंचायतीत झालेल्या विद्युत कामाच्या अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिकेबाबत मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी करूनही त्यांनी उपलब्ध करून दिले नाही.
यामुळे या कामांची स्वतंत्रपणे शासकीय तंत्रनिकेतन नगर (विद्यूत विभाग) यांच्यावतीने तांत्रिक तपासणी आणि चौकशी करण्यात आली. या अहवालात चौधर यांनी नमुद केलेले परिमाण यात तफावत आढळून आली.
यावरून शाखा अभियंता यांनी या कामात गैरव्यवहार केला असल्याचे दिसत असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.