ताज्या बातम्या

लव्ह जिहाद-धर्मांतराचे प्रकार घडल्यास ‘पीआय’चे निलंबन; पालकमंत्री आक्रमक

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : लव जिहाद, धर्मांतराचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. ज्या पोलीस स्टेशनच्या हहीत असे प्रकार उघडकीस येतील, त्यासंदर्भात पहिली कारवाई त्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकावर केली जाईल. पोलिसांनी मोकळेपणे काम करावे.

गुन्हेगारी मोडण्यासाठी पोलिसांना पूर्ण पाठबळ आहे, मोकळीक आहे, असे विधान राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आ.बबनराव पाचपुते, आ.लहू कानडे, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी. जी.शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी उपस्थित होते.

तर सभागृहात शांतता कमिटीचे सदस्य आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रदीर्घ बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या सूचनांचा नामदार विखे पाटील यांनी मुद्देनिहाय आढावा घेतला.

चांगल्या सूचनांचे स्वागत करीत याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. विखे पाटील म्हणाले, लव जिहाद, धर्मांतराचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. ज्या पोलीस स्टेशनच्या हहीत असे प्रकार उघडकीस येतील, त्यासंदर्भात पहिली कारवाई त्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकावर केली जाईल.

पोलिसांनी मोकळेपणे काम करावे. आमच्याकडे सर्वांच्या कुंडल्या आहेत. याद्या तयार आहेत. पोलिसांना जात-धर्म नाही. कायदा हातात घ्याल तर नक्कीच धडा शिकवला जाईल, असा समाजकंटकांना इशारा देखील त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी म्हणाले, प्रत्येकानेच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कुठे चुकतो याचा विचार सर्वांनीच करावा. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत प्रशासन कठोर भूमिकेत आहे. पोलीस आणि प्रशासनाने समोर कोण आहे ते न पाहता चुकीचा असेल त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, असे म्हटले. बैठकीचे प्रास्ताविक अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी केले.

Ahmednagarlive24 Office